सुधा मुर्तींनी सांगितलं आनंदी आयुष्याचं रहस्य

दुसऱ्यांवर अवलंबून राहिल्यामुळे अन् जास्तीच्या अपेक्षांमुळे अडचणी निर्माण होतात. 

यातून दुःख सहन करावं लागतं. त्यासाठी सुधा मुर्तींनी काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्या पाहुया...

दोन व्यक्ती वेगळ्या असतात, दोघांच्या मतांचा आदर करा आणि एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. 

आनंदी जीवनासाठी तुमच्या आयुष्यातील माणसं जशी आहेत, तशी स्वीकारा. 

जोडीदारावर प्रेम करताय ना? मग, त्याला त्याची स्पेस किंवा वेळ द्या. 

जोडीदारावर नियंत्रण अजिबात ठेवू नका, त्याचा मतांचा आदर करा. 

तुम्ही सोडून तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात अनेक गोष्टी आहे, याचं भान ठेवा. 

आपल्या जोडीदाराची इतर व्यक्तींशी अजिबात तुलना करू नका. 

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एकमेकांबद्दल कृतज्ञता दाखवा. या गोष्टींमुळे तुमचं आयुष्य आनंदी राहील.