शिळी चपाती करेल मालामाल, कसं ते जाणून घ्या
बऱ्याचदा कुटुंबातील सर्वांचं जेवण झाल्यावर काही चपात्या शिल्लक राहतात.
अनेकदा ही चपाती फेकून दिली जाते, परंतु आता हीच शिळी चपाती तुम्हाला श्रीमंत करण्यास मदत करू शकते.
शिळ्या चपात्या केवळ स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी नाही तर तुम्हाला पैशांनी मालामाल करण्यासाठी देखील कारणीभूत ठरू शकतात.
ज्योतिषशास्त्रात कुंडलीशी संबंधित सर्व ग्रहांचे दोष दूर करण्याच्या संदर्भात चपातीच्या संबंधित अनेक उपाय सांगितले आहे.
साडेसातीपासून सुटका मिळवण्यासाठी अमावास्येला किंवा शनिवारी दोन शिळी चपाती आणि खीर गायीला खायला द्या. याने शनीचा प्रकोप कमी होतो.
काही जणांच्या कुंडलीमध्ये राहू दोष असतो.
तेव्हा त्यापासून सुटका मिळवण्यासाठी दररोज चपातीला मोहरीचे तेल लावून काळ्या श्वानाला खायला द्या.
दररोज चपाती बनवताना त्यातील एक चपाती गायीसाठी बाजूला काढून ठेवा आणि तिला खायला घाला. असे केल्याने सुख समृद्धी प्राप्त होईल.