घशाच्या खवखवीवर रामबाण उपाय
हिवाळा सुरु होताच सर्दी, खोकला, ताप या समस्या सुरु होतात.
या हंगामात बऱ्याचदा घास खवखवणे, घशामध्ये वेदना होतात.
हा त्रास कमी करण्यासाठी आम्ही काही उपाय सांगत आहोत.
चहात आले, दालचिनी, पुदीना, कॅमोमाइल किंवा रोझमेरी घालून प्या.
लसूण खाल्ल्याने घसा खवखवणारे जीवाणू मारतात, सर्दीपासून आराम मिळतो.
जेष्ठमधाचा छोटा तुकडा दातांमध्ये ठेवा, त्याच्या रसामुळे घशाला आराम मिळतो.
एक कप उकळत्या पाण्यात अर्धा चमचा हळद, एक चमचा मीठ घाला, त्याने गुळण्या करा.
अॅप्पल सायडर व्हिनेगरचा हिवाळ्यातील आहारात जास्तीत जास्त समावेश करा.
एका ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मीठ घालून दिवसातून तीन वेळा गुळण्या करा.