दुपारी जेवणानंतर झोपण्याची सवय चांगली की वाईट?

दुपारी जेवल्यानंतर मस्त ताणून देण्याची सवय अनेकांना असते. याउलट, दुपारच्या झोपेमुळे दुष्परिणाम होत असल्याचं अनेकांचं मत असतं.

 मग दुपारी जेवल्यानंतर झोपावं की झोपू नये, असा प्रश्न पडू शकतो. या प्रश्नाचं उत्तर काही अटींसह होकारार्थी आहे.

दुपारी जेवणानंतरच्या वामकुक्षी ही संकल्पना पूर्वीपासून प्रचलित आहे. वामकुक्षी घेणं चांगलं; मात्र त्याचे नियम पाळणं गरजेचं असतं.

न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी दुपारी झोपण्याचे फायदे आणि त्याचे नियम यांबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली होती.

दुपारी जेवल्यानंतर लगेच डाव्या कुशीवर आडवं पडून 10 ते 30 मिनिटांपर्यंतच झोपणं उपयुक्त. हा कालावधी दुपारी 1 ते 3 या वेळेतलाच असावा. 

लहान मुलं, आजारी व्यक्ती, वृद्ध व्यक्तींनी 90 मिनिटांपर्यंत वामकुक्षी घेतली तरी चालते; मात्र संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत अजिबात झोपू नये.

वामकुक्षीच्या वेळेत आडवं पडून टीव्ही, फोन पाहणं टाळावं. जेवल्यानंतर चहा, कॉफी, सिगारेट, चॉकलेट्स या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.

ऑफिसमध्ये असलेल्या व्यक्तींनी शक्य असल्यास इझी चेअरवर किंवा डेस्कवर डोकं ठेवून डुलकी काढली तरी उपयोगी ठरतं. 

वामकुक्षीमुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं. हृदयविकार, हाय बीपी असलेल्यांना वामकुक्षी फायद्याची ठरते.

वामकुक्षीमुळे पचन चांगल्या रीतीने होतं. रात्रीची झोप सुधारते. शरीरातल्या हॉर्मोन्सचं संतुलन सुधारतं.

आजारपणातून उठल्यानंतर, तसंच वर्कआउटमुळे आलेला थकवा वामकुक्षीमुळे कमी होतो. फॅट्स कमी व्हायलाही मदत होते.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?