तांदळाला कीड लागू नये म्हणून खास टिप्स
पावसाळाजवळ आला की बरेचजण 3 ते 4 महिने पुरतील इतके किलो तांदूळ घरी साठवून ठेवतात.
परंतु अनेकदा साठवून ठेवलेल्या या तांदळाला कीड लागण्याचा किंवा त्यात भुंगे होण्याचा धोका असतो.
तेव्हा तांदळाला कीड लागू नये यासाठी काय करायला हवे यासाठी आम्ही तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहोत.
कडीपत्ता : तांदळात कडीपत्त्याची पाने टाकून ठेवल्यास त्याला कीड लागत नाही.
लसूण : तांदळात लसूणच्या पाकळ्या टाकल्यास लागलेली कीड कमी होण्यास मदत होते.
तेजपत्ता : तांदळात तेजपत्ता अथवा तमाल पत्र टाकल्यास तांदळाला कीड लागत नाही.
मिर्च्या : कोरड्या मिरच्या तांदळात ठेवल्यास तांदळाला लागलेली कीड कमी होते.
लवंग : लवंगांच्या जबरदस्त सुगंंधामुळे तांदळास लागलेली किड नष्ट करण्यास मदत मिळते.
उन्हात सुकवणे : तांदळाला किड लागू द्यायची नसेल तर त्याला कडक उन्ह्यात सुकवणे गरजेचे आहे.