भात खाताय? मग 'या' गोष्टी माहित असायलाच हव्या

भात हा आपल्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. याच्याशिवाय अनेकांना त्यांचं पोट भरलंय असं वाटतच नाही

कढी-भात, डाळ-भात किंवा छोले भात असो, बहुतेक लोक चपाती ऐवजी भात खाण्यास प्राधान्य देतात

भातामध्ये कर्बोदके आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. ते सहज पचतात, त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते

पचनाच्या समस्यांमध्येही डॉक्टर भात खाण्याचा सल्ला देतात. वास्तविक, ते पचनसंस्थेवर दबाव आणत नाही आणि सहज पचते

इतके फायदे असूनही भात खाण्याचे तोटेही आहेत. जास्त भात खाल्ल्याने शरीराचे अनेक नुकसान होऊ शकतं

वजन
जे लोक भात जास्त प्रमाणात खातात, ते भाज्या, फळे, सुका मेवा इत्यादी कमी प्रमाणात खातात

यामुळे शरीरात पोषक तत्वांची कमतरता होते, ज्याचा वजनावर परिणाम होऊ शकतो

मधुमेह
भातामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, जो मधुमेहाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतो

जास्त प्रमाणात भात खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी भात खाणे टाळावे

मेटाबॉलिक सिंड्रोम
हे एकत्र अनेक समस्या असतात, ज्यामध्ये रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल, फॅट इत्यादी समस्या वाढतात. अशा लोकांनी भात खाणे टाळले पाहिजे