जास्त व्यायाम करण्याचे दुष्परिणाम!

जिममध्ये व्यायाम करणं असं चांगले मानले जाते, मात्र कोणतीही गोष्ट मर्यादेबाहेर करणे घातकच असते. 

तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केला तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकते. 

तुम्ही जास्त प्रमाणात व्यायाम केल्यास अनेक महिने तुमच्या मसल्समध्ये वेदना असू शकतात. 

जास्त प्रमाणात व्यायाम केल्यास झोप कमी होते आणि रात्री अस्वस्थता जाणवते.

प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केल्यास तुमची भूक कमी होऊ शकते. 

जास्त व्यायाम केल्यास शरीरात हार्मोनल चेंजेस येतात, ज्यामुळे वजन कमी होते. 

जास्त व्यायामामुळे रोग प्रतिकारक्षमता कमी होते आणि कायम थकवा जाणवतो. 

जास्त प्रमाणात व्यायाम केल्याने हृदयावर अधिक जोर पडतो, जे आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. 

एका रिपोर्टनुसार, जास्त व्यायामामुळे महिलांच्या शरीरात इस्ट्रोजेन हार्मोन कमी होऊ लागते.