ब्रेस्टचा
वाढता आकार धोक्याची घंटा!

आपले ब्रेस्ट
विशिष्ट आकाराचे असावेत
असं अनेक महिलांना वाटतं.

लहान ब्रेस्ट मोठे करण्यासाठी काही महिला
सर्जरीही करून घेतात.

पण काहीही न करता
ब्रेस्टचा आकार बराच वाढणं
हे चिंताजनक आहे.

तज्ज्ञांच्या मते
ब्रेस्टचा आकार वाढल्याने
बऱ्याच आजारांचा धोका वाढतो.

महिलांच्या शरीरातील फॅट त्यांच्या आरोग्याबाबत
बरंच काही सांगतं.

शरीराच्या विशिष्ट भागात
फॅट जमा होणं खतरनाक असतं, त्यापैकी एक ब्रेस्ट.

2008 साली
महिलांच्या ब्रेस्टबाबत
एक रिसर्च झाला.

मोठे ब्रेस्ट असलेल्या
20 वर्षीय मुलींमध्ये
डायबिटीजचा धोका वाढतो.

पुढल्या 10 वर्षात
या तरुणींमध्ये
मधुमेहाचा धोका वाढतो.

2012 सालातील रिसर्चनुसार मोठ्या स्तनांच्या महिलांमध्ये आजारांचा धोका कमी दिसला.

मात्र या महिलांमध्ये
विसरल फॅटचा धोका
वाढलेला दिसला.

विसरल फॅटमुळे शरीरात
हानिकारक केमिकल वाढतं.

ज्यामुळे
सूज, टाइप 2 डायबिटीजसारखे
आजार होऊ शकतात.

तज्ज्ञांच्या मते वय, गर्भावस्था, ब्रेस्ट फिडिंग, जेनेटिक हिस्ट्रीशिवायही ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो.