बाळाला कोणत्या वयात जन्म द्यायचा हा त्या पालकांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र बाळ सुधृढ, आगोग्यदायी असावं हे प्रत्येक पालकाला कायम वाटतं
मग अशा वेळी आईने कोणत्या वयात बाळाला जन्म देणं योग्य आहे? असा प्रश्न उपस्थीत केला जातो
वयाची 25 ते 35 वर्ष आई होण्यासाठीचं वय योग्य आहे असं स्त्री रोग तज्ञां सांगतात
मग आता असा प्रश्न उपस्थीत होतो की हेच वय का? यानंतर मुल होऊ शकत नाही का?
तर तज्ज्ञांच्या मते स्त्रियांच्या वाढत्या वयामुळे गर्भाशयात गुंतागुंत वाढू शकते
अनेकदा गर्भाशयाती अंडाशयातील अंड्यांची संख्या कमी होऊ लागते. ज्यामुळे समस्या वाढतात. चला हे उदाहरणाच्या मार्फत समजून घेऊ
1. जेव्हा एखाद्या मूलीचा जन्म होतो तेव्हा तिच्या गर्भाशयात 10 लाख अंडी असतात
2. मुलींची पाळी सुरु झाल्यावर या अंड्याची संख्या कमी होऊन ती 3 लाख इतकी होते
3. वयाच्या 37 वर्षी हीच संख्या आणखी कमी होऊन 25 हजार इतकी कमी होते
4. तर वयाच्या 51 वर्षापर्यंत याचंच प्रमाण 1 हजार पेक्षाही खाली येतं
5. त्यातही फक्त 300 ते 400 अंड्यांमध्ये मूल जन्माला घालण्याची क्षमता असते
म्हणजेच काय तर, जसं महिलांचं वय वाढतं, तस त्यांच्या अंडाशयातील अंड्याची संख्या कमी होत जाते
या अंड्यातील गुणवत्ता आणि दर्जा देखील कमी होतो. त्यामुळे स्त्रीयांनी लवकर आई झालेलं केव्हा ही चांगलं