बिझनेस टायकून रतन टाटा झाले 84 वर्षांचे

उद्योगपती आणि दानशूर व्यक्ती अशी ओळख असलेले रतन टाटा 84 वर्षांचे झाले आहेत.

मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंतचे उद्योग असलेला समूह अशी टाटा ग्रुपची ओळख आहे.

रतन टाटांच्या नेतृत्वाखाली हा समूह 40 पटींनी वाढला. 

1991 मधल्या 5.7 अब्ज डॉलर्सपासून 2016मध्ये या समूहाची उलाढाल 103 अब्ज डॉलर्सवर पोहोचली.

रतन टाटांच्या अध्यक्षतेखाली असतानाच टाटा समूहाने लँडरोव्हर जग्वार, टेटली टी, व्हीएसएनएल अशा काही दिग्गज कंपन्या विकत घेतल्या.

रतन टाटा 10 वर्षांचे असतानाच त्यांचे आई-वडील नवल व सूनी टाटा विभक्त झाले. 

हार्वर्डमध्ये शिकल्यानंतर IBM मध्ये नोकरीची संधी असताना त्यांनी टाटा समूहात काम सुरू केलं. 

रतन टाटा उत्तम आर्किटेक्ट आहेत. कॉर्नेलमधून शिकल्यावर सुरुवातीला 2 वर्षं त्यांनी आर्किटेक्ट म्हणून काम केलं.

लाखातल्या कारचं स्वप्न नॅनोच्या रूपाने, तर भारतात कार विकसित करण्याचं स्वप्न इंडिकाच्या रूपाने त्यांनी पूर्ण केलं.

त्यांना ब्रिटनकडून 'सर' ही उपाधी मिळाली आहे. कार्स आणि कुत्र्यांची त्यांना विशेष आवड आहे.