वर्ध्यातील पंक्चर दुकानदाराने टायरपासून आकर्षक कलाकृती बनवल्या आहेत.
वर्ध्यातील कारंजा बस स्थानक परिसरात टायर पंक्चर दुरुस्तीचे काम करणाऱ्या मोहम्मद दाबिर शेख यांची ही कला आहे.
टाकाऊ टायरपासून विविध आकाराच्या रोपांच्या कुड्या, कचराकुंड्या, प्राणी, गाड्यांच्या कलाकृती बनवल्या आहेत.
टायर पासून बदक, बगळा, मोर, हत्ती, कासव, कावळा, चिमणी, कमळ वृक्ष कुंड्या बनवलेल्या आहेत.
टायरच्या कलाकृती रस्त्याने येजा करणाऱ्या नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय बनला आहे.
जवळपास दीडशेच्यावर अशा कलाकृती दुकानाच्या बाजूला मांडण्यात आल्या आहेत.
नागरिक देखील अशा सुंदर कलाकृती मोहम्मद दाबिर शेख यांच्याकडून खरेदी करू शकतात.