प्रेग्नंसी असल्यास फक्त Periods मिस होत नाही, ही लक्षणं पण दिसतात

 केवळ मासिक पाळी न येणं हे एकच गर्भधारणेचं लक्षण असू शकत नाही.

याशिवाय, इतरही अनेक लक्षणं आहेत, जी गर्भधारणा झाल्याचे दर्शवतात.

 हार्मोन्समधील बदलांमुळं स्तनांमध्ये जडपणा जाणवतो. हे देखील गर्भधारणेचं लक्षण असू शकतं.

उलटी किंवा उलटीची भावना होणं देखील गर्भधारणेचं लक्षण असू शकतं.

दिवसा किंवा रात्री जास्त लघवीला जावं लागणं हे देखील एक लक्षण आहे.

शरीरात अचानक थकवा जाणवणं हे देखील गर्भधारणेचं लक्षण असू शकतं. कधी कधी थोडा वेळ बसावंसं वाटतं

योनिमार्गातून थोडा-थोडा रक्तस्राव आणि पाळीप्रमाणे पेटके येणं हे देखील गर्भधारणेचं लक्षण आहे.

राग, चिडचिड किंवा विनाकारण वारंवार मूड बदलण्याची समस्या असू शकते.

जर तुम्ही गर्भवती असाल तर, तुमच्या शरीराचं तापमान वाढलेलं दिसेल.