तुम्ही केव्हा आणि काय खाणार याचं नियोजन करा

डाएट प्लॅनमध्ये चीट मील्स किंवा चीट डेजचा समावेश करणं फिटनेस एंथुझिअस्ट्समध्ये लोकप्रिय आहे.

बहुतांश तज्ज्ञांना असं वाटतं, की एका आठवड्यात एक चीट मील हे प्रमाण पुरेसं आहे. त्यामुळे वीकेंड किंवा एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्याचं नियोजन करा.

पूर्वनियोजित धोरणापासून विचलित होऊ नका.

केवळ एकाच प्रकारचं अन्न खाऊ नका. 

वेगवेगळे घटक पदार्थ वापरून आकर्षक रेसिपीज तयार करा.

तुम्हाला हवं ते खा; पण ते नैसर्गिक घटकांपासून तयार करा. 

कोणत्याही एका वेळी अति म्हणजेच खूप जास्त प्रमाणात खाऊ नका. 

तुम्ही किती खाताय याकडे लक्ष ठेवा आणि प्रमाण काटेकोरपणे पाळा.

चीट मीलचा प्रयोग योग्य प्रकारे केल्यास वेट लॉसचे फायदे जास्त प्रमाणात मिळू शकतात.