OMG! या प्राण्यामध्ये आहेत 3 हृदयं आणि 9 मेंदू; तुम्हाला माहित आहे का कोण?

प्रत्येक प्राण्याला एक मेंदू आणि एक हृदय असतं, असं आपल्याला माहिती आहे; पण 3 हृदयं आणि 9 मेंदू असलेला एक प्राणी अस्तित्वात आहे.

त्या अनोख्या प्राण्याचं नाव आहे ऑक्टोपस.

आठ पाय असलेल्या या सागरी प्राण्याला 3 हृदयं आणि 9 मेंदू असतात, हे ऐकूनच आश्चर्य वाटतं.

ऑक्टोपसची दोन हृदयं त्याच्या दोन गिल्समधून रक्ताचं पंपिंग करतात.

दोन गिल्समधून पास झाल्यावर ऑक्टोपसच्या रक्ताला ऑक्सिजन मिळतो.

त्यानंतर त्याचं मध्यवर्ती हृदय ऑक्सिजनयुक्त रक्त शरीरात सगळीकडे पोहोचवतं.

त्याच्या 9 मेंदूंपैकी 8 मेंदू त्याच्या 8 पायांसाठी म्हणजेच Tentacles साठी असतात.

हे 8 मेंदू मायक्रो ब्रेन म्हणून काम करतात. 9वा मुख्य मेंदू पूर्ण शरीराला नियंत्रित करतो.

म्हणूनच ऑक्टोपस हा खूप हुशार प्राणी समजला जातो.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?