नवरात्री उत्सव सुरु झाला असून सगळीकडे जल्लोष पहायला मिळतोय. या नवरात्रीत फक्त महिलाच नाही तर पुरुषांनाही आहे या 'नऊ'रंगांची क्रेझ असते. 

पहिला रंग हा पांढरा आहे. पांढरा रंग शुद्धता आणि भोळपेणा दर्शवतो.

दुसऱ्या दिवशीचा रंग लाल आहे. लाल रंग आवड आणि प्रेमाचं प्रतीक आहे

तिसऱ्या दिवशीचा रंग निळा आहे. निळा रंग शांतता दर्शवतो.

चौथ्या दिवशीचा रंग पिवळा आहे. पिवळा रंग सणाचा उत्साह आणि आनंद दर्शवतो. 

पाचव्या दिवशीचा रंग हिरवा आहे. मोरपंखी रंग वाढ आणि सुपिकतेचं प्रतीक आहे. 

सहाव्या दिवशीचा रंग राखाडी आहे. राखाडी रंग भावनांचं संतुलन दर्शवतो. 

सातव्या दिवशीचा रंग हा नारंगी आहे. नारंगी रंग उब व सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. 

आठव्या दिवशीचा रंग हा मोरपंखी आहे. मोरपंखी रंग विशेषता आणि व्यक्तिमत्त्व दर्शवतो. 

शेवटी नवव्या दिवसाचा रंग हा गुलाबी आहे. गुलाबी रंग प्रेम, आपुलकी आणि सुसंवादाचं प्रतीक मानला जातो.