प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर हक्काचं छप्पर देणारा देश - फिनलँड

गेल्या काही वर्षांपासून फिनलँड हा जगातला सर्वांत सुखी देश आहे. 

सरकारने सर्वांसाठी निवाऱ्याची व्यवस्था केल्यामुळे तिथे कोणी बेघर नाही.

कोणीही बेघर नसावं यासाठी 40 वर्षांपूर्वीच फिनलँडने प्रयत्न सुरू केले.

शॉर्ट टर्म शेल्टर्सद्वारेही अनेकांची दीर्घ काळ राहण्याची व्यवस्था झाली

घराअभावी पत्ता नाही, म्हणून नोकरी नाही, म्हणून घर नाही, असं दुष्टचक्र

या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याच्या अनुषंगाने धोरण ठरवणं हे मोठं आव्हान.

2008मध्ये फिनिश सरकारने बेघरांसाठी नव्या घरांचं धोरण स्वीकारलं.

त्यानंतर बेघरांची संख्या घटू लागलेला तो युरोपातला एकमेव देश ठरला.

बेघर व्यक्तींना तिथे आधी कोणत्याही अटी न घालता फ्लॅट दिला जातो.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?