सध्या हिवाळा सुरु आहे आणि थंडी देखील बरीच वाढली आहे. यामुळे लोक आपल्या शरीरासोबत खाण्यावर देखील लक्ष देतात.
हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, त्यामुळे डॉक्टर देखील आपल्या आहारावर लक्ष देण्यास सांगतात.
पपई एक असं फळ आहे. जे तुम्हाला इतर आजारांपासून लांब ठेवतं. त्यामुळे पपई एक फळच नाही तर औषधही आहे.
पपईमध्ये व्हिटॅमिन A,C अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरसह अनेक पोषक घटक आढळतात.
पपईमध्ये आढळणारे फायबर बद्धकोष्ठता आणि पोटदुखीसह अनेक समस्यांपासून आराम देते.
पपई खरेदी करताना तुम्ही बाजारात जाल तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं. जेणे करुन पपईचे योग्य फायदे शरीराला होतील.
लक्षात ठेवा की, पपईवर डाग नसावेत आणि पपई अगदी ताजी असावी. पपई कुठूनतरी दाबली असेल तर ती विकत घेऊ नका.
आपण बऱ्याचदा विचार करतो की आपण तो भाग कापून टाकू आणि उर्वरीत पपई खाऊ, पण असं करु नका.
पपई कापताना लक्षात ठेवा की खूप वेळापासून कापलेले पपई खाऊ नये. ही पपई शरीराला फायद्याऐवजी नुकसानच पोहोचवते.
पपईवर अनेक लोक काळे मीठ, साखर, चाट मसाला लावून खातात. पण हे सारखं खाणं चांगलं नाही. मीठ लावून ठेवलेली पपई जास्त वेळ झाल्यानंतर टाकून द्या.
विवाहितांसाठी पपई वरदानापेक्षा कमी नाही. आर्जिनिन नावाचे संयुग असते जे रक्त परिसंचरण सुधारते आणि शिरा उघडण्याचे काम करते. यामुळे पुरुषांमधील इरेक्शन बरे होते