निरोगी राहायचंय? मग या पदार्थांमध्ये घालू नका साखर!
आपल्या अनेक शारीरिक व्याधी किंवा समस्यांना साखर जबाबदार असते.
आपण खात असलेल्या अनेक पदार्थनामध्ये आधीच साखर असते.
त्यात आपण वरून साखर घालतो आणि इथूनच समस्या निर्माण होतात.
काही पदार्थांमध्ये साखर मिसळणे चांगले असते. मात्र काहींमध्ये ते पूर्णपणे टाळावे.
फळांमध्ये नैसर्गिक साखर असते, त्यामुळे यामध्ये अतिरिक्त साखर मिसळणे हानिकारक ठरू शकते.
साखर न घालता दूध प्यायल्यास त्याचे शरीराला जास्त फायदे मिळतात.
नाश्त्यामध्ये कॉर्नफ्लेक्स किंवा ओट्स घेताना त्यात साखर घालू नये.
फळांपासून बनवलेल्या मिठाईमध्ये साखर घालणे टाळले पाहिजे.
साखर न घालता कॉफी पिण्याचे अनेक फायदे असतात.