गर्दी टाळा आणि मुंबईतल्या या स्थळांना द्या भेट

भारताचे प्रवेशद्वार 'गेट वे ऑफ इंडिया' हे मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण आहे. याच ठिकाणी हाॅटेल ताजमहाल आहे. 

एलिफंटा लेणीमध्ये त्रिमुख ब्रह्म, विष्णू आणि महेशाचे दर्शन घडते. या घारापुरी लेणी असंही म्हटलं जातं.

भारतील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानक 'शिवाजी महाराज टर्मिनस' आहे. ही इमारत सुंदरतेचा उत्कृष्ट नमुना आहे. 

मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी, बॅण्डस्टॅण्ड हे समुद्र किनारे वीकेंडसाठी उत्तम पर्याय आहेत. 

चैत्यभूमी येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मरणार्थ बनवली आहे. तिथेही चैत्यभूमीसहीत समुद्र किनाराही पाहायला येतो. 

हाजी अली दर्गा मुंबईतील बेस्ट ठिकाण आहे. इथं समुद्राला ओहोटी असेल तेव्हाच जाता येते. 

लहान मुलांना आवडणारी राणीची बाग पाहायला लोक पसंत करतात. तिथे पेंग्विन्स पाहायला मिळतात. 

जुन्या चर्चगेटच्या बाॅम्बे फोर्टजवळ हुतात्मा चौक आहे. तेही पाहाण्यासारखे आहे. 

ज्या पर्यटकांना अवकाश आणि खगोलशास्त्राची आवड आहे, त्यांनी नेहरू तारांगणला जरूर भेट द्यावी. 

भारतीय संस्कृतीचे दर्शन घ्यायचे असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाला अवश्य भेट द्या.