उंच निवासी इमारतींमध्ये Fire Safety च्या 'या' नियमांचं पालन होत आहे का?

22 जानेवारीला सकाळी साडेसातला मुंबईत 'कमला' इमारतीला भीषण आग लागली.

ताडदेव परिसरातल्या 20 मजली इमारतीच्या 18व्या मजल्यावर ही दुर्घटना घडली

दुर्घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला असून, 15 जण गंभीर जखमी झाले.

Fire Safety साठी घ्यावयाच्या काळजीचा विषय यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे

दुर्घटना टाळण्यासाठी नॅशनल बिल्डिंग कोडमधल्या नियमांचं पालन आवश्यक आहे

नॅशनल बिल्डिंग कोडमध्ये सुरक्षित इमारतींच्या बांधकामाचे नियम दिले आहेत

आग लागल्यास बाहेर जाण्यासाठी प्रत्येक मजल्यावर दोन मार्ग हवेत.

या मार्गावरच्या पायऱ्यांची रुंदी 2 मीटर असल्यास चेंगराचेंगरी टळते.

इमारतीतल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पाण्याचा भरपूर साठा उपलब्ध असावा.

इमारतीत Automatic Sprinkler आणि डिझेल जनरेटर बसवलेला असावा.

उंच इमारतींमध्ये Fire Fighters साठी अधिक वेगाची स्वतंत्र लिफ्ट असावी.

इमारतीतल्या रहिवाशांना वेळोवेळी फायर ड्रिलचं प्रात्यक्षिक दाखवलं जावं.

आग प्रतिबंधक, संरक्षणविषयक उपायांबद्दल रहिवाशांमध्ये जागृती करावी.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?