पुरुषांनाही येते
मासिक पाळी
मासिक पाळी म्हटलं की ती महिलांनाच येते, पण पुरुषांनाही पीरियड्स येऊ शकतात.
वैद्यकीय भाषेत याला
प्री मेन्स्ट्रुअल किंवा इरिटेबल मेल सिंड्रोम म्हणतात.
टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन वाढल्याने, कमी झाल्याने हा सिंड्रोम होतो.
या सिंड्रोमची लक्षणं जवळपास मासिक पाळीच्या लक्षणांसारखीच असतात.
डिप्रेशन, चिंता, चिडचिड,
मूड सतत बदलणं
अशी मानसिक लक्षणं दिसतात.
थकवा, चक्कर येणं, स्नायू दुखणं, आखडणं अशी शारीरिक लक्षणं दिसतात.
काम आणि सेक्स करण्याचीही इच्छा होत नाही.
मानसिक तणाव, चिंता, चुकीच्या सवयी, चुकीची जीवनशैली
या समस्येला कारणीभूत.
तज्ज्ञांच्या मते, याचा परिणाम 24 तास किंवा 48 तासांपर्यंतही राहतो.