35-50 हजारात करा परदेश प्रवास

सगळ्यांनाच परदेश प्रवास करण्याची इच्छा असते. पण मुख्य प्रश्न असतो तो बजेटचा

काळजी करु नका, जगाच्यापाठीवर अशी काही ठिकाणं आहेत. जिथे कमी खर्चात प्रवास करु शकता

सिंगापूर
फिरण्यासोबत रुचकर खाण्याची आवड असेल तर सिंगापूर उत्तम पर्याय. इथे फिरण्यासाठी ४० ते ५० हजार रुपये खर्च येतो

म्यानमार
सौंदर्यासाठी हे ठिकाण फेमस आहे. येथे भेट देणाऱ्यांमध्ये अनेक भारतीय आहेत. तुम्ही 35 ते 45 हजारांमध्ये म्यानमार फिरू शकता

थायलंड
हे जगभरातील लोकांसाठी प्रेक्षणीय स्थळ आहे. येथील आधुनिक शहरे आणि सांस्कृतिक वारसा लोकांना आकर्षित करतो

थायलंडच सुंदर बीच आणि नाईटलाइफ देखील खूपच चर्चेत असते. येथे ४५ ते ५० हजारांच्या बजेटमध्ये फिरता येतं

श्रीलंका
अर्थात, गेल्या दोन वर्षांपासून आर्थिक संकटामुळे श्रीलंकेला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आहे, पण हा देश पर्यटकांवर आधारित आहे

इथली संस्कृती, आल्हाददायक वातावरण, खाणंपिणं आणि सुंदर लँडस्केप तुम्हाला आवडेल. येथे फिरण्यासाठी ३५ ते ४० हजारांचा खर्च येतो

इजिप्त
ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचा छंद असेल तर इजिप्तपेक्षा चांगला पर्याय नाही. हा देश आपल्या संस्कृती आणि इतिहासासाठी प्रसिद्ध आहे

नाईल नदी, भव्य पिरॅमिड्स आणि अनेक प्राचीन मंदिरे आकार्षण केंद्र आहे. जवळजवळ ५० हजारांच्या बजेटमध्ये तुम्ही येथे फिरू शकता

व्हिएतनाम
सुंदर नद्या, समुद्रकिनारे आणि बौद्ध मंदिरं लोकांना आकर्षित करतात. शिवाय या देशात अन्नपदार्थ देखील फारच मस्त आहेत. या देशात 30 ते 40 हजारात फिरु शकता