समोर सिंह आल्यास जीव कसा वाचवायचा?

जंगल सफारी करताना किंवा रस्त्यावरही अचानक सिंह समोर येतात.

रस्त्यावर सिंह फिरत असल्याचे बरेच व्हिडीओही तुम्ही पाहिले असतील.

सिंहाला पाहून भीती वाटणं साहजिक आहे. पण ती चेहर्‍यावर दाखवू नका. 

सिंहाला समोर पाहून पॅनिक होऊ नका. सर्वात आधी शांत व्हा.

सिंहासमोर उभे राहा पण त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहत राहू नका.

तुमच्या हातांची हालचाल करत राहा, गरज पडल्यास मोठ्याने ओरडा.

जेणेकरून सिंहाला तुम्ही कमजोर वाटणार नाही, तो तुम्हाला लहान शिकार समजणार नाही.

सिंहाला पाठ दाखवून पळण्याचा प्रयत्न बिलकुल करू नका. जिथे आहात तिथंच उभे राहा.

सिंहाकडे तोंड ठेवूनच हळूहळू तुमची पावलं मागच्या दिशेने टाका.

सिंह दिसेनासा होईपर्यंत असं उलटं चाला आणि मग तिथून पळून जा.

तरीही सिंहाने हल्ला केला तर तो तुमचा चेहरा आणि मानेवरच हल्ला करेल.

त्यामुळे त्याच्या डोळ्यावर किंवा डोक्याच्या मध्ये मुक्के मारू शकता.

सिंहासमोर तुमची ताकद काहीच नाही पण तरी यामुळे जीव वाचण्याची शक्यता आहे.