हिरा चाटला तर माणूस मरतो का? 

भारतात सोन्याला सर्वात महत्व आहे आणि त्याची किंमतही जास्त आहे. पण असं असलं तरी हिरा सोन्याहून जास्त महाग आहे.

हिऱ्यांचे अनेक प्रकार असतात. काही हिरे अगदी स्वस्तात मिळतात तर काहींची किंमत अगदी करोडो रुपयात असते.

विज्ञानानुसार हिरा पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ आहे जो कार्बनचे घनरूप आहे.

हिऱ्यांशी संबंधित बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात किंवा समजुती आहे, चला त्याबद्दल जाणून घेऊ

लोकांचा असा विश्वास आहे की जर एखाद्या व्यक्तीने हिरा चाटला तर त्याचा मृत्यू होतो, पण असं नाही.

हिरा हा विषारी पदार्थ नसल्यामुळे असे होत नाही. पण हो हिरा गिळणे तुम्हाला नक्कीच धोक्यात आणू शकते.

हिरा इतका कठोर का?
हिऱ्याच्या कडकपणाचे रहस्य म्हणजे त्याची रासायनिक रचना. कार्बनचे अणू एकमेकांशी खूप घट्ट बांधलेले असतात. 

हिऱ्याच्या वजनाबद्दल बोलायचे झाले तर त्याचे 1 कॅरेट सुमारे 200 मिलीग्राम इतके असते.

जर तुम्हाला वाटत असेल की हिऱ्याला तुम्ही दातांनी तोडू शकता, तर असं करणं जवळ-जवळ अशक्यच आहे.

हिऱ्यातील कार्बन पार्टीकल्स अशापद्धतीने घट्ट पकडलेले असतात की, तो दातांनी तोडणे अशक्य आहे.