मटारबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?

मटार हे कडधान्य असल्याने तो प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे.

मटार अँटिऑक्सिडंट्ससह व्हिटॅमिन ए, बी, सी, डी यांनी समृद्ध असतात.

ताज्या मटारमध्ये असलेलं व्हिटॅमिन के कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखतं. 

मटारमध्ये अमिनो अॅसिड्स आणि फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात.

ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी डबाबंद हिरवा मटार अजिबात खाऊ नये, असा सल्ला दिला जातो. 

मटारसोबत ब्राउन राइस आहारात असेल, तर मटारमुळे त्रास होण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं.

मटार प्रमाणात खाल्ल्यानं ब्लड शुगर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहतं.

प्रमाणापेक्षा जास्त मटार खाल्ले, तर शरीरातलं कॅल्शियम कमी होतं आणि हाडं कमकुवत होऊ शकतात.

ताजे, हिरवे मटार जास्त प्रमाणात खाल्ले, तर वजन वाढू शकतं. 

मटार जास्त प्रमाणात खाल्ले, तर पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.