प्रवाश्यांना रोपे वाटणारा रिक्षा चालक !
कोल्हापुरातील एक रिक्षाचालक प्रत्येक प्रवाशाला एक रोपटे भेट देतो.
कोल्हापुरातील महेश शेवडे हे रिक्षाचालक हा अनोखा उपक्रम राबवतात.
रिक्षाचालकाकडून रोपांची विशेष भेट मिळण्याचा अनुभव कोल्हापूरकरांना नेहमी येतो.
2005 साली कोल्हापूरमध्ये अनेक मोठी झाडं तोडण्यात आली.
ही कत्तल त्यांना पाहवली नाही. त्यामधून त्यांनी हा निर्णय घेतला.
2007 पासून प्रवाशांना रोप भेट देत आहे. आतापर्यंत 22 हजारांपेक्षा जास्त रोप दिलीत.
यात आंबा, फणस, करंजी, बदाम, रामफळ, सीताफळ, जांभूळ, चिंच, उंबर, कडुलिंब, तुळस
या कार्याबद्दल त्यांना 2012 साली किर्लोस्कर कंपनीकडून वसंतराव गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
पाहिल्यानंतर तुम्हाला रिक्षाचालकाचं कौतुक वाटल असेल ना !