भिजवलेले बदाम खाण्याचे अनेक फायदे

कोरड्या बदामापेक्षा भिजवलेले बदाम हे पचायला हलके असतात. तेव्हा रात्री बदाम पाण्यात भिजत घाला आणि सकाळी खा.

भिजवलेले बदाम खाल्याने शरीरातील रक्ताभिसरण क्रिया चांगल्याप्रकारे होऊन रक्तदाब संतुलित होत.

बदामामध्ये एन्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी6, कॅल्शियम,फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, तांबे, फॉस्फरस, लोह झिंक असे अनेक पोषक घटक असतात.

टाईप 2 डायबिटीज  लोकांनी  भिजवलेले पदार्थ खाल्ल्याने त्यात असलेल्या मॅग्नेशियम घटकामुळे त्यांच्या रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते.

बदामामध्ये व्हिटॅमिन ई असते, ज्यामुळे त्वचा नितळ आणि तजेलदार व्हायला मदत होते. चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत.

भिजवलेले बदाम खाल्याने केस गळण्याचे प्रमाण कमी होते. आपले केस दाट आणि मजबूत होतात.

भिजवलेले बदाम खाल्ल्याने मेंदू तीक्ष्ण होतो, स्मरणशक्ती वाढायला मदत होते.

भिजवलेले बदाम नियमित खाल्याने आपल्या शरीरातील हाडे, स्नायू मजबूत होतात आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

बदामामध्ये असलेल्या मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस् आणि व्हिटॅमिन ई मुळे, आपल्या शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते