भाजीत मीठ जास्त झालं तर काय कराल?

मीठ हा आपल्या खाण्यापिण्यातील सर्वात महत्वाचा घटक आहे. मीठ अन्नाची चव वाढवत असल्याने ते बहुतेक पदार्थांमध्ये वापरले जाते.

परंतु काहीवेळा पदार्थात मीठ जास्त प्रमाणात पडले, तर पदार्थ खारट होतो आणि त्याची संपूर्ण चव बिघडून जाते.

तेव्हा एखाद्या भाजीत किंवा पदार्थात मीठ जास्त प्रमाणात पडलं तर ते कमी करण्यासाठीच्या सोप्या घरगुती टिप्स जाणून घेऊयात. 

भाजीत जर मीठ जास्त झाले असेल तर त्यात उकडलेले बटाटे टाका, काही मिनिटांनी ते बाहेर काढा. बटाटा भाजी अथवा सूपमधील अतिरिक्त मीठ शोषून घेते.

 पिठाचा गोळा मीठ शोषून घेतो त्यामुळे मीठ जास्त झालेल्या पदार्थात तो काही मिनिट टाकून ठेवा. मीठ शोषून घेतल्यावर पिठाचा गोळा बाहेर काढा.

दही - मीठ जास्त झालेल्या भाजीत तुम्ही 1 ते 2 चमचे दही टाकल्याने देखील मिठाचे प्रमाण कमी होऊ शकते.

लिंबाचा रस - भाजीत जर मीठ जास्त झाले असेल तर भाजीच्या प्रमाणानुसार तुम्ही त्यात लिंबाचा रस पिळून टाकू शकता. यामुळे भाजीचा खारटपणा आणि तिखटपणा कमी होऊ शकतो.

बेसन - दोन चमचे बेसन घेऊन तव्यावर चांगले भाजून घ्यावे. बेसनाचा रंग गडद होऊन सुगंध येऊ लागल्यावर भाजीमध्ये घालून हलक्या हाताने मिक्स करा. अशा प्रकारे मीठाचा प्रभाव कमी होईल आणि भाजीची चव देखील वाढेल.

ब्रेड - पदार्थामधील खारटपणा दूर करण्यासाठी ब्रेडदेखील उपयोगी राहील. पदार्थात एक-दोन ब्रेडचे स्लाइस टाकून थोड्या वेळाने काढून घ्यावे.