हे फळं ह्रदय आणि फुफुसाठी आहे रामबाण


उन्हाळा सुरु होताच बाजारात अनेक प्रकारचे फळ विक्रीसाठी येत असतात.

सध्या बाजारात एक असं फळ आलं आहे जे अनेक आजारांवर रामबाण इलाज आहे.

हे फळं बिकानेरमधील बाजारामध्ये केवळ एक महिनाच मिळते.

खिरनी असे या फळाचे नाव असून याला आयुर्वेदात 'राजफळ' असे देखील म्हंटले जाते.

खिरनी फळाचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

खिरनी फळात अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट असतात.

हे फळ खाल्लयाने शरीराला मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि फायबर मिळते.

हे फळ फुफुस आणि हृदयरोगासारख्या आजारावर गुणकारी ठरते.

खोकला, सर्दी, ताप, श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी आजार बरे होण्यासाठी देखील खिरनी हे फळं फायदेशीर ठरते.