अद्भुत आणि भव्य असं जैन मंदिर!
भारत देशातील मंदिरांचा इतिहास खूप जुना आहे. हजारो वर्षे जुनी अशी अनेक मंदिर भारतात आहेत.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का? की मंदिरे बांधण्यापूर्वी त्यांची रचना कशी केली जाते.
जैसलमेरपासून 20 किमी अंतरावर असलेल्या बैसाखी गावात बांधलेले श्री छत्तरगच्छ संघ सिंधरी भगवानचे अद्वितीय मंदिर आहे.
बैसाखी गावातील या जैन मंदिराच्या बांधकामाची कारागिरी आणि कलात्मकता अप्रतिम आहे.
मंदिराच्या बांधकामात पांढऱ्या संगमरवरी दगडांसह, जोधपूर आणि जैसलमेरच्या दगडांचा वापर करण्यात आला आहे.
या दगडांवर 2012 पासून सुंदर आणि रेखीव कोरीव काम करण्यात येत आहे.
या मंदिर परिसरात बांधलेली विहीर रहस्यमय आहे. सध्या येथील भूजल पातळी 500 फुटांपर्यंत खोल गेल्याचे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यांचे म्हणणे आहे.
परंतु बैसाखी गावातील जैन मंदिराच्या प्रांगणातील विहिरीत केवळ 10 फुटांवर पाणी येत आहे.
या विहिरींमध्ये गंगा आणि यमुनेचे पाणी येते असे लोक म्हणतात.