कोंब आलेले
बटाटे खाल्ल्याने
मृत्यूचा धोका
बटाट्यांना कोंब आले तरी ते काढून वापरले जातात.
कोंब आलेले बटाटे खाणं आरोग्यासाठी हानिकारक आहे.
सोलानाइन, चाकोनाइन हे विषारी पदार्थ बटाट्यामध्ये असतात.
बटाट्यांमध्ये याचं प्रमाण कमी पण रोप, पानांमध्ये जास्त असतं.
यामुळे बटाट्यांना कोंब फुटल्यानंतर विषारी घटकांचं प्रमाण वाढतं.
असे बटाटे खाल्ल्यास हे विषारी घटक आपल्या शरीरात जातात.
असे बटाटे एक-दोनदा खाल्ल्याने जास्त नुकसान होत नाही.
पण जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटाशी संबंधित समस्या होतात.
उलटी, जुलाब, पोटदुखी अशी लक्षणं दिसू लागतात.
गंभीर स्थितीत ताप,
लो बीपी, डोकेदुखी अशी लक्षणं दिसतात.
कोंब आलेले बटाटे खाणं वेळीच थांबवलं नाही तर मृत्यूही होऊ शकतो.
नॅशनल कॅपिटल पॉयझन सेंटरच्या अहवालात असं म्हटलं आहे.
...तर चपातीमुळे
होऊ शकतो कॅन्सर
Heading 3
इथं क्लिक करा