लग्नात मंगळसुत्र उलटं का घालतात?

हिंदू लग्नाच्या परंपरेनुसार लग्नाच्या दिवशी मुलीला मंगळसुत्र घातले जाते.

लग्नात बऱ्याचदा नवऱ्या मुलीला उलटं मंगळसुत्र घातलं जातं, हे मंगळसुत्र काही दिवसांनी किंवा लग्नानंतरच्या पहिल्या सणाला सरळ केलं जातं.

पण तुम्हाला लग्नात असं उलटं मंगळसुत्र का घालतात या मागचं कारण माहितीय का?

वैज्ञानिक दृष्टीने पाहिल्यास, मंगळसूत्रामुळे लग्न झालेली स्त्री नेहमी आनंदी राहाते.

मंगळसूत्र हे सोने आणि चांदीने बनविण्यात येते. दोन्ही धातू हे महिलांच्या हृदयाला निरोगी राखण्यास मदत करतात.

या धातूंमुळे रक्तदाब नियंत्रणात राहाते, तसेच काळे मणी महिलांना राहू, केतू, शनिच्या दुष्प्रभावापासून वाचवतात.

वराकडील एक सुवासिनी वधूस अष्टपुत्री नावाची दोन वस्त्रे, कंचुकी आणि काळ्या मण्यांचे मंगळसूत्र देते.

दोन्ही वाट्यांमध्ये हळद आणि कुंकू हे सौभ्यागाचे लक्षण भरलं जातं, ज्यामुळे ते सर्वांना दाखवण्यासाठी उलटे घातले जाते. 

तसेच हे उलटं मंगळसुत्र पाहून लोकांना कळते की महिला नुकतीच सैभाग्यवती झाली आहे.

भारताच्या संस्कृतीमध्ये मंगळसूत्र म्हणजे विवाहित महिलांसाठी सौभाग्याचे रक्षा कवच मानण्यात येते.