प्राचीन भारतातील मासिक पाळीसंबंधीत मान्यता

अनेक ठिकाणी मासिक पाळीमध्ये महिलांना आजही लांब बसवलं जातं आणि त्यांना बाहेर फिरु देत नाहीत.

पण तुम्हाला माहितीय मासिक पाळीसंबंधीत प्राचीन भारतात काय परंपरा किंवा मान्यता होत्या?

इतिहासकार नरेंद्र नाथ भट्टाचार्य यांच्या मते, पूर्वीच्या काळात मासिक पाळी शुभ मानले जात होते. स्त्रियांची देवी म्हणून पूजा केली जात असे.

पूर्वीच्या काळी स्त्रिया मासिक पाळीत घातलेले कपडे पुरून टाकत. या कापडाचा वापर जादू करण्यासाठी केला जात असे.

जुन्या काळात स्त्रियांना वेगळे ठेवले जात असे. याचे कारण अस्पृश्य असणे नव्हे, तर त्यांची काळजी घेणे होते.

या काळात महिलांना पोट आणि अंग दुखण्याचा जास्त त्रास होतो. त्यामुळे त्यांना एका जागीच अन्न आणि सर्व काही आणून दिले जाते.

मासिक पाळीत महिलांचे पाय दुखतात आणि पूर्वीच्या काळी मंदिरे लांब असायची. त्यामुळे महिलांना मंदिरात जाऊन पूजा करण्यास मनाई करण्यात आली होती.

कर्नाटक, तामिळनाडू, आसाम, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात मासिक पाळी संबंधित सण साजरे जायचे, ही प्रथा आजही काही भागात आहे.

प्राचीन काळी असा समज होता की मासिक पाळीच्या काळात स्त्रीने गायीला स्पर्श केल्यास त्या बांझ होतात.