'हे' पदार्थ वाढवतील पोटातील गुड बॅक्टेरिया 

गुड बॅक्टेरिया आतडे निरोगी ठेवतात. यामुळे पचनसंस्था तंदुरुस्त राहते. 

वाईट बॅक्टेरिया कमी करण्यासाठी शरीरातील चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढवणे आवश्यक आहे. 

आपण रोज खात असलेल्या पदार्थांमध्ये चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे बॅक्टेरिया असतात. 

सहसा उन्हाळ्यात पोट खराब होते, याचे कारण शरीरात चांगल्या बॅक्टेरियाची कमतरता असते. 

आहारात काही पदार्थांचा समावेश करून चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवता येते.

दही हा प्रोबायोटिक्सचा म्हणजेच चांगल्या बॅक्टेरियाचा मुख्य स्त्रोत मानला जातो. याचा पोटाला फायदा होतो.

उन्हाळ्यात टरबूज शरीराला पाण्याचा पुरवठा करण्यासोबतच पोटात चांगले बॅक्टेरिया वाढवून पोट थंड करते. 

ताक पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवण्याचे काम करते आणि अन्न पचण्यास मदत करते. 

सत्तूमध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम असल्याने हे उन्हाळ्यात चांगले बॅक्टेरिया वाढवण्याचे काम करते.