पदार्थ खारट असो वा गोड, खीर-बिस्किटे असो किंवा बर्फी, त्यात मनुका एक आवश्यक भाग असतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा आहे. 

मनुक्यांचा वापर पदार्थांची चव वाढवण्यासाठी करतात. फक्त चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही मनुके फायदेशीर आहेत. 

शरीरातील रक्ताच्या कमतरतेसाठी मनुके खाणे फायदेशीर आहे. नीट पचन होण्यासाठी देखील मनुका उपयुक्त ठरेल. 

मनुके आपण तसेच खाऊ शकतो किंवा रात्रभर पाण्यात भिजवून खाऊ शकतो. 

मनुका फायबरने समृद्ध आहे, त्यामुळे पचन सुधारण्यास मदत होते. 

मनुके आकाराने लहान वाटत असले तरी त्यांच्यात संपूर्ण दिवसाच्या उर्जेसाठी पुरतील इतकी खनिजे असतात.

जेवणानंतर अनेकांना गोड खाण्याची इच्छा असते, अशावेळी मनुके खाणे उपयुक्त ठरू शकते, त्यामुळे शुगरही वाढणार नाही

मनुक्यांमध्ये लोह, कॅल्शियम आणि बोरॉनचा खजिना असतो. 

यामध्ये पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळतात, ज्यामुळे तुमचे शरीर निरोगी राहते आणि चेहरा चमकदार बनतो. 

मनुके खाण्याचे अनेक फायदे असले तरी मर्यादित प्रमाणातच खाणे योग्य ठरेल, शरीराच्या गरजेनुसार प्रमाणासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.