वास्तुशास्त्रानुसार घरातील झाडूचे महत्त्व; घरात झाडू कुठे असावा?

घरातील साफसफाई करणाऱ्या झाडूला खूप महत्त्व आहे. त्यासंदर्भातील वास्तू टिप्स जाणून घेऊया...

वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेला किंवा आग्नेय दिशेला झाडू ठेवावा. त्यातून सकारात्मक ऊर्जा घरात येते.

झाडू बेडरूममध्ये ठेवू नका. तसेच झाडू हा नेहमी लपवून ठेवा. 

किचनपासून झाडू हा दूर ठेवावा आणि रात्री किचन झाडू नये. 

झाडू बदलायचा असेल, तर शनिवारी नवीन झाडू खरेदी करा. 

झाडूला चुकूनही घरात उभं करून ठेवू नका, त्याने घरात दरिद्रीपणा येतो. जमिनीवर अडवा झाडू ठेवा. 

वास्तुशास्त्रानुसार झाडूला कधीही पाय लावू नका. तसे केल्याने लक्ष्मी नाराज होते. घरात धान्याची कमी होते. 

स्वप्नात झाडू दिसणे शुभ मानला जातो. घरात सुख-समृद्धी येते. 

स्वप्नात झाडू दिसणे वास्तुशास्त्रानुसार धनलाभ होण्याचे संकेत आहेत.