दिवसाची सुरुवात चांगली हवीय, तर या टिप्स फाॅलो करा

दिवसाची सुरुवात चांगली झाली की, संपूर्ण दिवस चांगला जातो. 

बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवतो, त्यामुळे या टिप्स महत्त्वाच्या आहेत.

सकाळी उठल्यानंतर अजिबात चहा किंवा काॅफी घेऊ नका. त्याऐवजी लिंबू-पाणी घ्या. 

व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे सकाळी व्यायाम केल्याने आपण फ्रेश होतो. 

शरीराला पाण्याची खूप गरज असते, त्यामुळे भरपूर पाणी प्या, त्यामुळे थकवा जाणवत नाही. 

रात्री जास्त जागू नका. वेळेवर झोपा म्हणजे सकाळी मन फ्रेश राहील. 

जास्त ताण घेऊ नका. जास्त ताण घेतला की, कामात मन लागत नाही. 

जंक फूड अजिबात खाऊ नका आणि त्याने शरीरात थकवा निर्माण होतो. 

व्हिटॅमीन-बी असणारे दूध, केळी, अंडी खा, याने सकाळी थकवा जाणवणार नाही.