हिवाळ्यातील थंडीत बरेच लोक गरम पाण्यानेच
अंघोळ करतात.
अनेकांच्या घरात गरम पाण्यासाठी गिझर असतो.
पण गिझर वापरताना छोटीशी चूक
जीवावर बेतू शकते.
गॅस गिझरमुळे मृत्यूची
काही प्रकरणंही आहेत.
गॅस गिझरमधून कार्बन मोनोऑक्साइडसारखा हानिकारक गॅस निघतो.
या गॅसचं प्रमाण वाढल्यास बाथरूममध्ये असलेली व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते.
असा गॅस असलेल्या
बंद बाथरूममध्ये
श्वास कोंडतो, मृत्यू होतो.
त्यामुळे गॅस गिझर वापरताना आवश्यक ती काळजी घ्यायला हवी.
बाथरूममचा दरवाजा बंद करण्याआधीच गिझरने पाणी गरम करून घ्या.
गॅस गिझर चालू ठेवून बाथरूमचा दरवाजा बंद करू नका.
गिझर बंद केल्यानंतरच अंघोळ करा.
बाथरूममध्ये क्रॉस व्हेंटिलिशन असेल
याची खबरदारी घ्या.
एक जण अंघोळ करून आल्यानंतर लगेच बाथरूममध्ये जाऊ नका.
दुसऱ्याने अंघोळीआधी
काही वेळ बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवा.
शक्यतो गॅस गिझर बाथरूमबाहेरच असल्यास उत्तम.
बाथरूममध्ये पाणी पाइपच्या माध्यमातून नेता येऊ शकतं.