EPFO पोर्टलवर एक्झिट डेट अपडेट कशी करावी

कंपनी सोडल्याची तारीख EPFO पोर्टलवर ऑनलाइन अपडेट करता येते.

त्यासाठी https://unifiedportal-emp.epfindia.gov.in या लिंकवर जावं.

यूएएन आणि पासवर्ड टाकून पोर्टलवर लॉगिन करावं.

Manage या ऑप्शनवर जाऊन mark exit वर क्लिक करावं.

'सिलेक्ट एम्प्लॉयमेंट' या ड्रॉप डाउन मेन्यूवर क्लिक करावं.

त्यानंतर तुमचा ईपीएफ अकाउंट क्रमांक टाकावा.

डेट ऑफ एक्झिट अर्थात कंपनी सोडल्याची तारीख आणि कारण लिहावं.

वन टाइम पासवर्ड अर्थात ओटीपीसाठी रिक्वेस्ट टाकावी.

आधार क्रमांकाशी संलग्न मोबाइलवर आलेला ओटीपी पोर्टलवर टाकावा.

चेक बॉक्सवर क्लिक करून त्यातले पॉइंट्स काळजीपूर्वक वाचून घ्या

'अपडेट'वर क्लिक करून एक्झिट डेट अपडेट झालीय का ते तपासा

कर्मचारी, कंपनीकडून कॉन्ट्रिब्युशन थांबवलं गेल्यावर डेट अपडेट होते.

या सोप्या ऑनलाइन प्रक्रियेद्वारे डेट ऑफ एक्झिट अपडेट करता येते