महिला वर्ग आणि पैठणी साडीचं यांचं नातं अनोखं आहे. रेशमी धाव्यात विणली जाणारी पैठणी साडी ही प्रत्येक महिलेला हवीहवीशी वाटते.
पैठणी कितीही महाग असली तरी आपल्याकडे एकतरी पैठणी साडी असावी अशी स्त्रियांची इच्छा असते.
परंतु बाजारात अनेक बनावट पैठणी साड्या देखील विकल्या जातात. तेव्हा यामधून अस्सल पैठणी साडी कशी ओळखावी हे जाणून घेऊयात.
पैठणींमध्ये दोन प्रकार असतात एक मशीनमेड आणि दुसरी हातमागावर बनवलेली. यापैकी हातमागावर बनवलेली पैठणी ही अस्सल म्हणून ओळखली जाते.
हातमागावर बनवलेली अस्सल पैठणी ही महाग असून त्याची किंमत जवळपास 10 हजार पासून सुरु होते. तर मशीनने बनवलेली पैठणी ही तुलनेनं स्वस्त असते.
अस्सल पैठणी ही हातमागावर बनवली जाते त्यामुळे प्रकारात पैठणीवर धागा कुठेच दिसत नाही. म्हणजे उलट सुलट अशा दोन्ही बाजूनी ही पैठणी पहिली तर ती एकसारखीच दिसते.
अस्सल पैठणीच्या साडीची बॉर्डर आणि पदर एक सारखा असतो.
खऱ्या पैठणीचं वैशिष्ठ्य म्हणजे पैठणीची जर कधीच काळी पडत नाही.
मशीनमेड पैठणीमध्ये पदराच्या दोन्ही बाजूचे धागे उसवल्यासारखे दिसतात.