अ‍ॅसिडिटीपासून त्वरित अराम देतील हे 8 उपाय

उन्हाळा येताच अ‍ॅसिडिटीची समस्याही सुरु होते, यावर घरगुती उपायच उत्तम असतात. 

अ‍ॅसिडिटी असल्यास सकाळी रिकाम्यापोटी तुळशीची पाने खाल्यास आराम मिळेल. 

ताकामध्ये असलेले लॅक्टिक अ‍ॅसिड अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळवून देण्यासाठी फायदेशीर आहे. 

एक कप पाण्यामध्ये दालचिनी पावडर टाकून उकळून घ्या, हे पाणी अ‍ॅसिडिटीपासून आराम देते. 

थंड दुधामध्ये असलेले कॅल्शियम अ‍ॅसिडिटीची समस्या कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. 

नॅच्युरल अँटासिड रिच असल्यामुळे केळी पोटातील जळजळ कमी करण्यासाठी उत्तम उपाय आहे. 

माऊथ फ्रेशनरसोबतच बडीशेपमध्ये अ‍ॅसिडिटी कमी करण्याचीही क्षमता आहे. चहामध्येही याचा वापर करता येतो. 

व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेला आवळा अ‍ॅसिडिटीची समस्या कमी करण्यासाठी मदत करतो. 

नियमित आणि मर्यादित प्रमाणात गूळ खाल्याने अ‍ॅसिडिटीची समस्या हळूहळू कमी होते.