खराब प्लास्टिक खुर्च्या 5 मिनिटात करा चकाचक
खुर्चीवर पडलेले डाग अनेकदा घट्ट असल्याने ते सहजासहजी निघत नाहीत.
अशावेळी 2 ते 3 लिटर पाण्यामध्ये 2 ते 3 चमचे मीठ टाका आणि त्यात 3 चमचे लिंबूचा रस टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि एका स्प्रे बॉटलने खुर्चीवर स्प्रे करा.
यामुळे खुर्चीवर पडलेले घट्ट डाग आणि घाण नरम होतील आणि त्यांना साफ करणे सोपे जाईल.
खराब झालेल्या खुर्च्यांना साफ करण्यासाठी एक्स्पायर शॅम्पूचा देखील वापर करू शकता.
एक्स्पायर झालेल्या शॅम्पूना तुम्ही खराब खुर्चीवर लावा. काहीवेळ त्यांना ब्रशने घासून काढा.
सर्वात आधी एका भांड्यात 3 ते 4 चमचे एक्स्पायर शॅम्पू घ्या.
आता 2 ते 3 चमचे बेकिंग सोडा टाकून मिक्स करा आणि मग त्यात 1 ते 2 लिटर पाणी टाकून नीट मिक्स करून घ्या.
हे मिश्रण खुर्च्यांवर लावून 5 मिनिट ठेवा आणि मग काहीवेळ त्यांना ब्रशने घासून काढा. यामुळे खुर्च्या चांगल्या साफ होतील.
प्लास्टिक खुर्च्यांना साफ करण्यासाठी तुम्ही घरातील इतरही वस्तूंचा वापर करू शकता.
एक्सपायर शैम्पू , लिंबूचा रस, अमोनिया पावडर, ब्लिच पावडर देखील खुर्चीची स्वच्छता करण्यासाठी प्रभावी ठरू शकतो.