केक ताजा आहे की शिळा कसं ओळखाल?
सध्या लहान मोठ्या अनेक समारंभांमध्ये केक कापण्याचे प्रमाण वाढल्याने सध्या बेकरीत केकला मोठी मागणी असते.
पूर्वी केवळ वाढदिवसाच्या निमित्ताने कापला जाणारा केक हा आता लग्न, साखरपुडा, डोहाळे जेवण, घर भरणी, दुकानाचे उदघाटन यानिमित्ताने देखील कापला जातो.
सध्या नवनवीन डिझाईनचे केक बाजारात उपलब्ध असून यात बरीच व्हरायटी आली आहे.
परंतु बेकरीतून केक खरेदी करत असताना तो फ्रेश आहे की नाही हे जाणून घेणे देखील तितकेच गरजेचे आहे.
अन्यथा शिळा केक खाल्याने फूड पॉइजनिंग सारख्या समस्या उद्भवून आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम देखील होऊ शकतो.
शिळ्या केकेमध्ये अनेक हानिकारक बॅक्टेरिया निर्माण होतात.
केक बनवण्याच्या दोन प्रक्रिया असतात. आजकाल बहुतेक बेकरीमध्ये एग्लेस केक बनवले जातात. कारण हा केक बराच काळ टिकू शकतात.
अंड्याचा केक लवकर खराब होतो. अशावेळी केक विकत घेताना त्याचा वास येत नाही ना याची काळजी घ्यावी.
केक शिळा असेल तर त्यावर पाण्याचे थेंब गोठतात.