Holi 2022: धुळवड खेळताना नखांना जपा! अशी घ्या काळजी

होळीनंतर लगेचच धूलिवंदन आणि रंगपंचमी हे सण येतात. रंगांमध्ये मनसोक्त खेळण्याचे हे सण उत्साहाने साजरे केले जातात.

त्वचा, केसांचं रंगांपासून संरक्षण करण्यासाठी काळजी घेतली जाते; मात्र नखांच्या काळजीकडे फार लक्ष दिलं जात नाही. त्याबद्दलच्या या काही टिप्स..

लागलेला रंग काढण्यासाठी नखं घासू नयेत. त्यामुळे रंग अधिक गडद होतो आणि नखं रुक्ष होतात.

नखांचा रंग घालवण्यासाठी हात काही काळ गरम पाण्याऐवजी थंड पाण्यात बुडवून ठेवावेत. थंड पाण्यामुळे रंग लवकर सुटतो. 

नखांवरचा रंग घालवण्यासाठी लिंबू किंवा लिंबाचा रस यांचा वापर करणं उपयुक्त ठरतं.

लिंबामधले ब्लीचिंग एजंट नखांवरचा रंग सहज घालवतात. लिंबामुळे नखं मजबूत होण्यासही मदत होते.

रंग लागलेल्या नखांना महिलांनी ट्रान्स्परंट नेलपेंट लावावं. बदाम तेलाचे थेंब घातलेल्या कोमट पाण्यात बोटं थोडा वेळ बुडवावीत. हळूहळू रंग सुटेल.

हे झाले नंतरचे उपाय; पण नखांना फारसा रंग लागूच नये, म्हणूनही काही प्रतिबंधात्मक काळजी घेता येऊ शकते.

आदल्या रात्री झोपताना नखांवर बदाम तेल किंवा साजूक तुपाने मसाज करावा.

सकाळी रंग खेळण्याच्या आधी नखांवर डार्क रंगाचं नेलपेंट डबल कोटिंगसह लावावं. त्यामुळे नखांना दुसरा रंग लागणार नाही.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?