ओव्ह्युलेशनचे नेमके दिवस कसे ओळखाल?

आई होण्यासाठी स्त्रियांच्या ओव्ह्युलेशनच्या दिवसांमध्ये शारीरिक संबंध ठेवणे गरजेचे असते

ओव्हुलेशन कधी होते किंवा ते कसे मोजावे हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक सोपी पद्धत सांगणार आहोत

ओव्ह्युलेशन म्हणजे नेमकं काय?

हा प्रजननाच्या चक्राचा एक महत्त्वाचा भाग आहे, त्या वेळी अंडाशयातून बीजांड बाहेर पडून ते फॅलोपियन ट्यूबमध्ये येतं

पुरुषाच्या वीर्यातून आलेल्या शुक्राणूकडून त्या बीजांडाचं फलन होतं, तेव्हा फॅलोपियन ट्यूबमध्ये भ्रूण तयार होतो. नंतर तो यूटेरसमध्ये जाऊन गर्भ म्हणून विकसित होत जाते

शुक्राणूंकडून बीजांडं फलित केलं गेलं नाही, तर अशी अफलित बीजांडं नंतर मासिक पाळीच्या वेळी बाहेर पडतात

ओव्ह्युलेशनची लक्षणंप्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळी लक्षणं असू शकतात. ज्यामध्ये नर्वसनेस, संभोगाची इच्छा, स्तनांमध्ये नाजूकता, अंगावरुन सफेद जाणे आहे

ओव्ह्युलेशनचे दिवस कसे ओळखावे?

नियमित मासिक पाळी असलेल्या महीलांना दर महीन्याच्या 26 ते 32 दिवसांनी पाळी येते.

मासिक पाळीचे चक्र अनियमित, छोटे किंवा मोठे असणा-या महीलांमध्ये हे दिवस वेगळे असतात

लहान मासिक पाळीच्या सायकलमधून अठरा ही संख्या वजा करा. तुम्हाला 26 दिवसांनी मासिक पाळी येत असेल तर त्यातून अठरा वजा करा मग आठ हा आकडा येईल

त्याचप्रमाणे मोठ्या मासिक पाळीच्या सायकलमधून 11 ही संख्या वजा करा. 32 दिवसांनी पाळी येत त्यातूनही 11 वजा केल्यावर 21 हा आकडा येईल

मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून कॅलेंडरवर नोंद करण्यास सुरुवात करा आणि तुम्ही मोजलेल्या दिवसावर एक वर्तुळ करुन ठेवा 

उदाहरणार्थ 22 आणि 7 हे अंक आल्यास मासिक पाळीच्या सातव्या दिवसापासून ते 22 व्या दिवसापर्यंत तुम्ही गर्भाधारणेसाठी प्रयत्न करु शकता