उन्हाळयात एका दिवसात किती ज्युस प्यावा?
उन्हाळयात फळांचा ज्युस आपल्याला हेल्दी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर असतो.
डिहायड्रेशन झाल्यास फळांचा ज्युस त्यावर सर्वोत्तम उपाय असतो.
मात्र हा फळांचा ज्युसही एका मर्यादित प्रमाणात पिणेच योग्य असते.
एक कप फ्रुट ज्युसमध्ये साधारणपणे 120 कॅलरीज असतात.
एका दिवसात एका ग्लासपेक्षा जास्त ज्युस पिणे योग्य नाही.
ज्युसमध्ये साखर जास्त असते, जी ब्लड शुगर वाढवू शकते.
जास्त फ्रुट ज्युस प्यायल्यास दात किडण्याची शक्यता असते.
फ्रुट ज्युस पिण्याची योग्य वेळ नाश्त्याच्या नंतरची मानली जाते.
उन्हाळ्यात फ्रुट ज्यूसऐवजी ताजी फळं कापून खाणं जास्त फायदेशीर मानलं जातं.