अत्यंत प्राणघातक शस्त्रांत बंदुकीचा समावेश होतो.
बंदूक वापरणं जितकी सोपी तितकीच ती प्राणघातकसुद्धा आहे.
बंदुकीची गोळी लागून माणूस गंभीर जखमी होतो आणि त्याचा मृत्यू होतो.
बंदुकीचा प्रकार, गोळीचा आकार, वेग यावरही त्याचा परिणाम अवलंबून आहे.
बंदुकीच्या गोळीत
विषारी पावडर असते
ती पेटून स्फोट होतो.
या विषारी पावडरमध्ये शरीर पोळून काढण्याची, जाळण्याची क्षमता असते.
बंदुकीची गोळी अत्यंत वेगाने शरीरात घुसते.
तो अवयवदेखील फुटतो.
तिथल्या रक्तवाहिन्या फाटतात आणि
रक्तस्राव सुरू होतो.
रक्तस्राव
वेळीच न थांबवल्यास,
स्थिती अधिक गंभीर होते.
हृदय, मेंदूसारख्या
अवयवांना गोळी लागल्यास
शरीरावरील नियंत्रण सुटतं.
कधी गोळी लागल्याने झालेल्या जखमा सडतात आणि मृत्यू ओढावतो.