दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी 7 टिप्स
अनेकदा तोंडाची नीट स्वच्छता न ठेवल्याने दातांवर पिवळेपणाचा थर साचतो.
अशामुळे चारचौघात हसताना देखील लाज वाटते. हा पिवळेपणा घालवण्यासाठी या टिप्स वापरा.
उपाय 1- मीठ आणि मोहरीचे तेल पिवळ्या दातांवर प्रभावी आहे.
अर्धा चमचा मीठामध्ये मोहरीच्या तेलाचे काही थेंब मिसळा. हे लावून दातांना हलक्या हाताने मसाज करा. आठवड्यातून एकदा ही प्रक्रिया करा.
उपाय 2 - टूथपेस्ट आणि ब्रशच्या वर चिमूटभर बेकिंग सोडा टाका. यामुळे दातांवरील पिवळा थर निघून जातो.
उपाय 3 - स्ट्रॉबेरी मॅश करून दातांवर चोळा. ब्रश वापरून दात स्वच्छ करा. मग कोमट पाण्याने तोंड स्वच्छ धुण्यास विसरू नका.
उपाय 4 - लिंबू आणि संत्र्याची साले दातांवर घासा. आठवड्यातून दोनदा असे करा.
उपाय 5 - कडुलिंबाच्या काडीने दात घासल्याने आठवडाभरात तुमचे दात चमकदार दिसू लागतील.
उपाय 6 - ऍपल सायडर व्हिनेगरचा वापर दातांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे.
उपाय 7 : ब्रश केल्यानंतर संत्र्याच्या सालीच्या पावडरने दातांना हलक्या हाताने मसाज करा. दात पांढरे शुभ्र होतात.