हेल्मेट स्वच्छ करण्याच्या 4 सोप्या टिप्स

सध्या दुचाकीवर हेल्मेट घालणे सक्तीचे झाल्यामुळे अनेक दुचाकीस्वार हेल्मेटचा दररोज वापर करत असतात.

परंतु अनेकदा धूळ, वारा, पाऊस इत्यादींमुळे हेल्मेट खराब होऊन त्याच्यातून दुर्गंधी येऊ लागते.

तसेच हेल्मेट अस्वच्छ असल्याने आपल्याला त्वचेच्या विकारांचा धोका उद्भवू शकतो.

तेव्हा महिन्यातून एक ते दोन वेळा हेल्मेट स्वच्छ करणं गरजेचं आहे.

हेल्मेट स्वच्छ करण्यासाठी काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हेल्मेट साफ करण्यासाठी तुम्ही शॅम्पूचा वापर करू शकता. हेल्मेटच्या आतील पॅड्सला शँपू लावा, नंतर सर्वत्र घासून घेऊ पाण्याने स्वच्छ धुवा. हेल्मेट सहज साफ केला जातो.

बेकिंग सोडा देखील हेल्मेट स्वच्छ करण्यासाठी उपयोगी ठरतो. हेल्मेटमध्ये बेकिंग सोडा टाका आणि काही वेळाने तो पाण्याने स्वच्छ करा. यामुळे हेल्मेटमधील दुर्गंधी जाण्यास मदत होईल.

हेल्मेटची दुर्गंधी घालवण्यासाठी तुम्ही ब्लीचिंग पावडरचाही वापर करू शकता. 1 चमचा ब्लिचिंग पावडरमध्ये पाणी घालून मिश्रण तयार करा. काहीकाळ हेलमेट यात भिजवून ठेवा आणि मग स्वच्छ पाण्याने धुवून काढा.

हेल्मेट स्वच्छ करण्यासाठी बाजारात हेल्मेट क्लिनिंग किट्स देखील मिळतात. याचा वापरकेल्यामुळे तुमच्या हेल्मेट ही स्वच्छ होईल आणि नव्या सारखा चमकू लागेल.