How to meditate: घरीच अशाप्रकारे करा मेडिटेशन; या सोप्या पद्धती ठरतील फायदेशीर

आजच्या तणावपूर्ण जीवनात Yoga-Meditation मुळे बरीच शांतता मिळू शकते. घरी मेडिटेट करण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा टिप्स येथे देत आहोत.

ध्यानधारणेसाठी योग्य वेळ निवडणं गरजेचं आहे. शिल्लक कामांची चिंता वाटत नसेल अशा वेळी ध्यान करायला हवं.

घरात ध्यान करायचं असेल, तर शांतता असेल असं ठिकाण/ खोलीची निवड केली पाहिजे.

ध्यान करण्यासाठी बसताना Posture योग्य असणं, पाठ ताठ असणं आणि स्थिर बसणं आवश्यक आहे.

मेडिटेशनच्या दोन तास आधी हलका आहार घेतलेला असावा, जेणेकरून त्या वेळी झोप येणार नाही.

ध्यान करताना आपले श्वास आणि उच्छ्वासांवर लक्ष केंद्रित करावं. अनुलोम-विलोम करू शकता.

ध्यान करताना आनंदी, रिलॅक्स आणि शांत राहण्यासाठी चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवावं.

ध्यान करण्यात काही अडचणी येत असतील, तर इंटरनेटवरच्या मेडिटेशन म्युझिक व्हिडीओजची मदत घेऊ शकता.

ध्यान संपवताना डोळे पटकन उघडू नयेत. हळूहळू उघडावेत.

ध्यानावेळी मेडिटेशन म्युझिक ऐकू शकता. या सगळ्या टिप्स नियमितपणे अंमलात आणल्या, तरच ध्यानाची सवय लागू शकेल.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?